मिरवणुकीतील चार डिजे जप्त

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये डिजेसह सहभागी झालेल्या शिवसेनेसह चार मंडळांचे डिजे पोलिसांनी जप्त केले आहेत. संपूर्ण मिरवणूक मार्गावर डिजेचा आवाज शंभर डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे मोजणीत आढळून आले आहे. डिजे जप्त करून त्याचा अहवाल शहराचे सहायक पोलिस अधीक्षक यांना देण्यात येणार असून, त्यानंतर गुन्ह्यांबाबत सहायक पोलिस अधीक्षक हे निर्णय घेणार आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

शिवजयंतीनिमित्त नगर शहरातून सोमवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. शिवसेना, हिंदू राष्ट्र सेना, जय तुळजाभवानी, वर्चस्व ग्रुप ही चार मंडळे मिरवणुकि सहभागी झाली होती. चार ही मंडळाने डिजे लावले होते. त्य़ामुळे आवाजाचा दणदणाट झाला होता.

या डिजेंचा आवाज मोजण्यासाठी डेसिबल मीटरसह पोलिस स्टेशनची पथकेही तैनात होती. शिवसेना मंडळाचा डिजेचा आवाज १०३ डेसिबल इतका होत. तर वर्चस्व ग्रुपचा डिजेचा जास्तीत जास्त आवाज हा ९५ डेसिबल इतका भरला आहे. मिरवणूक चितळे रोड मार्गावर आल्यानंतर दहा वाजता पोलिसांनी मिरवणूक थांबविली.

कोतवाली पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेना व जय तुळजाभवानी मंडळाचे दोन्ही डिजेचे साहित्य, ट्रॅक्टर ट्रॉली हे साहित्य जप्त केले. तर तोफखाना पोलिसांनी शिवसेना मंडळ, वर्चस्व मंडळ या दोन्ही मंडळाचे डिजेचे साहित्य, ट्रॅ्क्टर, ट्रॉली, जनरेटर हे साहित्य जप्त केले आहे. हे सर्व जप्त साहित्य पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्यात आलेले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.