पारनेर ‘राष्ट्रवादी’तील धुसफूस कायम .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारनेर तालुकाध्यक्षपदासाठी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तालुकाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने पक्षांतर्गत धुसफूस पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. निवडीवर एकमत होत नसल्याने तालुकाध्यक्ष निवडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक विठ्ठलराव लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर बाजार समितीच्या सभागृहात शनिवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी क्रीयाशील सदस्यांसह तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे देण्यात आली होती.

बैठकीत तालुकाध्यक्षपदासाठी विद्यमान तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे, अशोक सावंत, सोमनाथ वरखडे, सबाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे यांनी पक्ष निरीक्षकांकडे अर्ज दिले. तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व त्यांच्या पक्षांतर्गत विरोधातील नेतेमंडळींचा दुसरा गट आहे. 

या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यानंतरही दोन्ही गटांचे मनोमिलन झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. या बैठकीचे निमंत्रण असूनही पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, जिल्हा परिषदेचे माजी मधुकर उचाळे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे यांनी अनुपस्थित राहून एकप्रकारे नाराजीच दाखवून दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तालुकाध्यक्ष निवडीच्या बैठकीवेळी सात इच्छुकांमध्ये एकमत होऊ न शकल्याने पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून तालुकाध्यक्ष निवडला जातो, की पक्षश्रेष्ठींकडून तालुकाध्यक्ष लादला जातो याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीमुळे पक्षाची हानी होत असल्याबद्दल सामन्य कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.