शिवजयंती मिरवणूकीत शस्त्र बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवजयंती मिरवणूक सुरू असताना धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कापडबाजारात एकाला ताब्यात घेतले. प्रमोद हिरालाल जाधव (१९, केडगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून लाकडी मूठ असलेला सत्तूर जप्त करण्यात आला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन मिरवणुकीत आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांनी पथकासह पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक कैलास देशमाने, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, सुधीर पाटील, श्रीधर गुट्टे, मधुकर शिंदे, मन्सूर सय्यद, रवी कर्डिले आदींनी ही कारवाई केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.