उपसरपंच निवडणुकीस सरपंच अनुपस्थित असल्‍यास अपात्रतेची कार्यवाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेऊन उपसरपंच याची निवड करणे कायद्याने बंधनकारक असून उपसरपंच निवडणुकीचे अध्‍यक्षस्‍थान भूषवून त्‍याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्‍या कर्तव्‍याचा भाग आहे. सदरचे कर्तव्‍य पार पाडण्‍यास सरपंचांनी कसूर केल्‍यास त्‍याचेवर नियमानुसार सक्षम प्राधिका-यांनी अपात्रतेची कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. ज्‍या ठिकाणी सरपंच हे त्‍यांचे वरीलप्रमाणे कर्तव्‍य पार पाडत नाहीत किंवा नसतील त्‍या ठिकाणी त्‍यांचेविरुध्‍द अपात्रतेची कार्यवाही तातडीने करण्‍यात यावी.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उपसरपंच निवडणूकीच्‍या पहिल्‍या सभेमध्‍ये सरपंचांनी उपसरपंच पदाची निवडणूक न घेणे, सरपंच अपरिहार्य कारणाविना अनुपस्थित राहणे, आजारी असल्‍याचे कारण देऊन पहिल्‍या सभेस उपस्थित न राहणे असे प्रसंग उपस्थित झाल्‍यामुळे उपसरपंच पदावर उचित उमेदवारांची निवड झालेली नसल्‍याचे निदर्शनास आले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
उपसरपंच निवडणूकीची सभा तहकूब झाल्‍यास मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्‍या नियम 12 मधील तरतूदीनुसार ही सभा दुस-या दिवशी तात्‍काळ घेण्‍यात यावी.उपसरपंचाच्‍या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्‍तव सरपंच उपस्थित राहण्‍यास असमर्थ असतील तर विहित कालावधीमध्‍ये पंचायतीचे गठण होणे आवश्‍यक असल्‍याने जिल्‍हाधिकारी यांनी प्रकरणपरत्‍वे सदर कारणांची खातरजमा करुन महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 33 पोट कलम 6(4) मधील तरतुदीप्रमाणे पीठासीन अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात येईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.