आमच्याकडे कामे घेवून येणारा मोकळ्या हाती जात नाही : आ. विजय औटी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचा आमदार असताही भरघोस निधी दिला. आता तर सत्तेत आहोत, त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही. तालुक्‍याचा विकास करत असताना रस्त्यांबरोबरच सर्व प्रथम पाण्याचा श्रोत कसा वाढविता येईल याला प्राधान्य दिले. गावागावात तलाव, साठवण बंधारे, केटीवेअरसह जलयुक्‍तीचे कामे प्रभावीपणे राबवली. त्यामुळे तालुक्‍याची दुष्काळी ही ओळख पुसलेली असून भर उन्हाळ्यातही शेतकरी कांद्यासारखी पिके घेवू लागला आहे.दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. माझ्याकडे काम घेवून येणारा कधीच मोकळ्या हाती जात नाही, असे प्रतिपादन आमदार विजय औटी यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बाबुर्डी (ता.पारनेर) येथे चौदाव्या वित्त आयोगातील 7 लाख 33 हजार 487 रुपये निधी खर्चून बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन व 2 लाख 37 हजार रुपये खर्चून तयार झालेल्या स्ट्रीटलाईटचे उद्‌घाटन आ. औटी यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे होते. यावेळी जि. प. सदस्य काशिनाथ दाते, उपसभापती दीपक पवार, पारनेर तालुका मित्र मंडळ पुणेचे उपाध्यक्ष मधुकरराव शितोळे, हनुमंत गायकवाड, शिवसेना उप जिल्हाप्रमुख रामदास भोसले, बाबुर्डीच्या सरपंच आशा सुभाष दिवटे, वाळवणेचे सरपंच उत्तमराव पठारे, नारायणगव्हाणचे सरपंच सुरेश बोरुडे, भोयरे गांगर्डाचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे, जातेगावचे माजी सरपंच विठ्ठलराव पोटघन, सुभाष दिवटे, मोहन साबळे, रांजणगाव मशिदीचे सरपंच अप्पासाहेब देशमुख, पप्पू गाढवे, संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष सचिन काकडे, संघटक ज्ञानदेव जगताप, सामाजिक कार्यकर्ते रामदास नगरे, संतोष रांजणे, ग्रामसेवक तिपोळे आदी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

सरपंच दिवटे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचे निवेदन आ. औटी यांना दिले. तसेच रस्त्याच्या कामाची मागणी केली. रोकडेश्‍वर मंदिर परिसरात सिमेंट कॉंक्रीटीकरण व तेथून पुढे एसटी बस स्टॅन्डपर्यंत रस्ता डाबरीकरण करण्याचे आश्‍वासन आ. औटी यांनी ग्रामस्थांना दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.