पॉलिश करण्याच्या बहाण्याने ९ तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो म्हणत घरात घुसलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलेला नादी लावून सुमारे 1 लाख ८० हजार रुपये किमतीचे ९ तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. ही घटना संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक येथे घडली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील चंद्रशेखर चौक येथे राहणाऱ्या शोभना चंदशेखर मुळे या घरी एकट्याच असताना दोन अज्ञात इसम त्यांच्या घरी आले. आम्ही सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, ते ही अगदी अल्पदरात असे म्हणून त्यांनी शोभना मुळे यांचा विश्वास संपादन केला. मुळे यांनी घरातील सर्व दागिने पॉलिशसाठी त्यांच्या स्वाधीन केले असता चोरटयांनी दागिने घेऊन पोबारा केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.