शिर्डीमध्ये नशेत बेधुंद असलेल्या तरुणीमुळे खळबळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नशेत बेधुंद असलेली तरुणी सोमवारी भल्या सकाळी दोनशे रुम भक्तनिवासजवळ आढळल्याने खळबळ उडाली. ही तरुणी नेमकी कुठली, तिला कोणी आणले, तिच्यावर काही गैरप्रसंग उद्ला  का आदी बाबींचा पोलिस शोध घेत आहेत. या तरुणीला प्रथम साईनाथ रुग्णालय, तेथून राहाता ग्रामीण रुग्णालय व नंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सकाळच्या फिरायला निघालेल्या नागरिकांना ही तरुणी आढळली. बेशुध्दावस्थेत असल्याने तिला तातडीने जवळच असलेल्या साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. नशेत तर्रर असल्याने तिला धड बोलता येत नव्हते. पोलिसांनी तिचे नाव, पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तिने कधी कोपरगाव, तर कधी कोळपेवाडी अशी विसंगत उत्तरे दिली. या तरुणीला कोणी शिर्डीत आणले, तिला कोणी मद्य पाजले का, तिच्यावर काही प्रसंग गुदरला का आदी बाबींची चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.