राज्यातील आया-बहिणींचे रक्षण करण्यात सरकारला अपयश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- परस्त्री मातेसमान जाण, अशी शिकवण देऊन महिलांना दैवताप्रमाणे जपणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात राजरोस महिलांवर अत्याचार होत आहेत. पत्नीच्या भावाला शासन करणारे शिवाजी महाराज कुठे आणि त्याच राज्यात आया-बहिणींचे रक्षण करण्यासाठी ५९ मोर्चे काढूनही जाग न येणारे शासन कुठे? आजच्या राजाला रायगडाचे संवर्धनदेखील करता येत नाही, अशी खंत शिवव्याख्याते संदीप औताडे यांनी व्यक्त केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आयटीआय मैदानावर शिवाज्ञा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानात औताडे बोलत होते. अध्यक्षस्थानी संगमनेर येथील शिक्षणशास्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर होत्या. व्यासपीठावर डॉ. संदीप कडलग, भाजपचे अॅड. वसंत मनकर, मीनानाथ पांडे, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील कडलग, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भास्कर कदम उपस्थित होते.

प्रारंभी शिवपुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आली, तसेच जिजाऊंना मानवंदना देण्यात आली. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. औताडे यांनी व्याख्यानात अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर टाकलेल्या धाडीपासून ते राजे आग्रा येथे असताना जिजाऊंनी जिंकलेला किल्ला आणि कोल्हापूरच्या बेळेवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांच्यावर अत्याचार करणारा आपला मेहुणा साकोजीराव यांना सुनावलेल्या शिक्षेचा इतिहास ऐकवला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निजामशाहीत शहाजीराजांनी चार वेळा केलेले बंड, शिवजन्म, बाजी पासलकर, बाजी प्रभू, तानाजी मालुसरे येथपासून १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात मेजर हरदयाल सिंग यांनी मिळवलेला विजय, वॉरन बफे करत असलेल्या चारशे कंपन्यांचे नियोजन, शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जपानची शून्यातून झालेली प्रगती, त्यांचे व्यवस्थापन कौशल्य यावर भाष्य केले. 

जे लोक पराक्रमी, कर्तृत्ववान असतात, त्यांचाच इतिहास जिता-जागता राहतो. म्हणूनच ३८७ वर्षांनंतरही आपण शिवरायांना विसरत नाही. औरंगजेब, विविध शाह्या, इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी हे सर्व जण महाराष्ट्राचे तुकडे पडायला तयार होते. एवढी भयंकर स्पर्धा असताना मोजक्या मावळ्यांना हाताशी धरून स्वराज्य निर्माण करणाऱ्या आणि रयतेला अपार प्रेम देणाऱ्या राजांचा सर्वांनी आदर्श घेतला, तरच शिवजयंती साजरी केल्यासारखे होईल, असे औताडे म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.