सभापती अनुराधा नागवडेंनी घेतला बाळासाहेब नाहाटांचा खरपूस समाचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आम्ही राजकारण धंदा म्हणून करत नाहीत. त्यामुळे आमच्या कुटुंबावर विचार करून टीका करा. आपली स्वतःची नीतिमत्ता तपासून पहा, अशा शब्दांत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचा समाचार घेतला.आढळगाव येथील खासगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नाहाटा हे कार्यक्रम संपण्याअगोदरच काढता पाय घेत निघून गेले होते.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या कार्यक्रमास नागवडे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, राजेंद्र म्हस्के, अनिल ठवाळ आदी उपस्थित होते.नाहाटा यांनी सुरुवातीला चिमटा काढत आम्ही ज्यांना राजकारणात मदत केली, त्यांनीच आमच्यासाठी खड्डे खोदण्याचे काम केले. मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जवळच्यांनी घात केला, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे नागवडे कुटुंबावर टीका केली. भाषण संपताच ते निघून गेले. 

ही टीका नागवडे यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, आम्ही राजकारण धंदा म्हणून करत नाही. नागवडे कुटुंबाने कधीच तडजोडीचे राजकारण केले नाही. आम्ही जे करतो, ते कार्यकर्त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करतो. स्वहिताचा कधीच विचार केला नाही. 

पण आपल्या तालुक्यात काहींनी राजकारणाचे पूर्ण वाटोळे करून टाकले आहे. राजकारणाचा त्यांनी धंदा केला आहे. अशा प्रवृत्ती जनता ओळखून आहे. त्यामुळे यापुढे नागवडे कुटुंबावर आरोप करताना भान ठेवावे. योग्यवेळी अशा प्रवृत्तींना उत्तर दिले जाईल, असे नागवडे म्हणाल्या.

नागवडे यांचा आक्रमक पवित्रा पाहून सर्वच नेत्यांच्या भुवया उंचवल्या होत्या. उपस्थितांत त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे राजकीय भांडण विखे, जगताप यांच्या मुळावर व पाचपुते यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

नाहाटा पुन्हा पाचपुतेंसोबत जाणार ? 
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाहाटा यांची उमेदवारी नागवडेंनी कापली. आढळगाव पं. स. गणात नाहाटांची पत्नी मनीषा यांचा पराभव नागवडेंच्याच कार्यकर्त्यांनी केला. हा राग मनात असल्याने नाहाटा यांनी नागवडे यांच्यावर टीका केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जगताप व नागवडे एकत्र आले, तरी बाळासाहेब नाहाटा मात्र नागवडे यांच्यामुळे जगताप, विखे यांच्यापासून दुरावून पाचपुते यांना मिळू शकतात, अशी चर्चा नाहाटा समर्थक करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.