शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रातील सीमेन स्टेशनच्या उद्घाटनाकडे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवल्याने तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. ४ मार्चला विद्यापीठाच्या नानासाहेब पवार सभागृहाच्या प्रांगणात उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला. उद्घाटन सीमेन स्टेशनचे असल्याने कृषी विद्यापीठाचा कुठलाही संबंध नव्हता. तथापि, मुख्यमंत्री येणार असल्याने कुलगुरूंसह शास्रज्ञ व कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून कामाला लागले होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नानासाहेब पवार सभागृहाबाहेर कृषी प्रदर्शन, तसेच सिमेन स्टेशनच्या मशिनरी व जातिवंत वळू निर्मितीच्या माहितीचे, तसेच कृषी विद्यापीठातील नवीन वाणाच्या संशोधनाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

औरंगाबाद येथील नियोजित कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री फडणवीस यांचे राहुरीत आगमन होणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा राहुरी दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमासाठी करण्यात आलेला लाखो रूपयांचा खर्च, तसेच कृषी विद्यापीठाच्या शास्रज्ञांची मेहनतही वाया गेली.

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नाने १०० कोटींचे सीमेन स्टेशन राहुरीला मंजूर झाले. मात्र, सीमेन स्टेशनच्या उद्घाटनाच्या निमंत्रणपत्रिकेत पवार यांचा नामोल्लेख टाळण्यात आला. कपाशी पिकांवर झालेल्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईचा प्रश्न संपूर्ण राज्यात गाजत असल्याने या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला असावा, अशी चर्चा आहे. 

२०१५ मध्ये कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर जातिवंत वळुंचे गोठीत वीर्य तयार करणाऱ्या सीमेन स्टेशनच्या कामाला सुरुवात होऊन २०१६ अखेर काम पूर्ण झाले. मुळा धरणातून कृषी विद्यापीठासाठी राखीव असलेल्या ५६६ दशलक्ष घनफूट पाण्यातून ६९ दशलक्ष घनफूट पाणी या सीमेन स्टेशनला पुरवण्यात येत आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाची मान्यता असलेल्या सीमेन स्टेशनमध्ये जातीवंत वळू तयार करण्यासाठी वर्षाला १ कोटी वीर्यमात्रा तयार करण्याची क्षमता आहे. रविवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टॅबलेटवर क्लिक करून सीमेनच्या स्टेशन प्रबंधन प्रणालीचा शुभारंभ केला जाणार होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेले सीमेन स्टेशनचे उद्घाटन लांबले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.