डॉ. सुजय विखेंची वाट सुकर करण्यासाठी अण्णासाहेब शेलारांना संधी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे सुपूत्र डॉ.सुजय विखे यांचे 'दक्षिणायन'सुरु झाले अाहे. माजी मंत्री स्व.बाळासाहेब विखे यांच्या दक्षिण नगर जिल्ह्यात असलेल्या जुन्या निष्ठावंताबरोबरच नव्यांना बरोबर घेऊन डॉ.विखे यांनी दीड वर्ष आधीच लोकसभा निवडणुकीसाठी दौरे सुरु केले आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यासाठी डॉ.विठ्ठलराव विखे मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध भागात सर्वरोग निदान शिबिरे सुरु करुन दक्षिण जिल्ह्याची संपर्क यात्रा सुरु केली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा अवधी असला तरी आतापासून डॉ. विखे यांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 

नगर दक्षिणेची जागा सध्या भाजपकडे आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली होती. मात्र या जागेवर राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला होता. गेल्या २५ वर्षांपूर्वी डॉ.सुजय यांचे आजोबा माजी मंत्री स्व.बाळासाहेब विखे यांनी देखील नगर दक्षिणेतून निवडणूक लढवली होती.ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व बाळासाहेब विखे यांच्यात ही लढत झाली होती. ही निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. यात विखे यांचा पराभव झाला होता, मात्र विखे यांनी दाखल केलल्या खटल्याचा निकाल विखे यांच्या बाजूने लागला होता.त्यामुळे गडाख यांची खासदारकी रद्द झाली होती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नियुक्ती करुन दक्षिण नगरला विशेष बळ
त्यानंतर आता डॉ. सुजय हे या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डॉ. सुजय यांनी दक्षिण जिल्हा पिंजून काढला होता. काँग्रेसकडून डॉ.सुजय विखे यांना तिकिट मिळणार की नाही, याबाबत निश्चित नसले, तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दुष्टीने काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी शेलार यांची नियुक्ती करुन दक्षिण नगरला विशेष बळ दिले आहे. 

निवड विखे यांच्या गटासाठी महत्त्वाची
शेलार हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून समजले जातात. शेलार यांचे माजी मंत्री स्व .बाळासाहेब विखे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबध होते. शेलार हे दक्षिण नगरमधील श्रीगोंदे तालुक्यातील आहेत. त्यामुळे त्यांची ही निवड विखे यांच्या गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 

काँग्रेस उरली केवळ पुण्यतिथी व जयंती करण्यापुरतीच ! 
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून काँग्रेसमध्ये मरगळ आली होती. राज्याचे विरोधी पक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था दयनीय झाली होती. ज्या नगरमध्ये काँग्रेसला मोठा इतिहास आहे. त्या नगर शहरात गेल्या अडीच वर्षांत काँग्रेस केवळ पुण्यतिथी व जयंती करण्यापुरतीच उरली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या काँग्रेस जणांना एकत्रित आणण्याचे मोठे काम नूतन जिल्हाध्यक्ष शेलार यांना करावे लागणार आहे.

सुजय विखेंसाठीच शेलार यांना संधी ?
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उत्तर नगरसाठी काँग्रेस अर्थात विखे गट उमेदवारांच्या शोधात आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील काही नेत्यांशी बोलणीही सुरु केले आहे. उत्तरेसाठी उमेदवार नसताना दक्षिणचे पारडे मात्र जड अाहे. दक्षिणेतून डॉ. सुजय यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी राष्ट्रवादीची भूमिका मात्र संभ्रमात टाकणारी आहे. निवडणुकीच्या दृष्टीने डॉ. सुजय यांची वाट सुकर करण्यासाठी विखेंकडून शेलारांना संधी देण्यात आल्याचे समजते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.