नगरसेवक हरविल्याची पाटी लावण्याचा नागरिकांचा इशारा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रभाग क्र.11 मस्किननगर परिसर येथील समतानगर राज्य कर्मचारी सोसायटीत एक वर्षापासून अर्धवट रस्त्याचे काम रखडले आहे. सत्ताधार्‍यांनी हाती घेतलेल्या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने, रस्त्यावर टाकण्यात आलेल्या दगडयुक्त खडीने नागरिकांच्या रहदारीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर वाहन चालकांचे लहान-मोठे अपघात घडत असून, अनेक ज्येष्ठ नागरिकांना दुखापत झाली आहे. संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असून चार दिवसात सदर रस्त्याचे काम सुरु न झाल्यास या भागात नगरसेवक हरविल्याचे फलक लावण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
एक वर्षापुर्वी माजी आ.अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम व नगरसेवक योगिराज गाडे यांनी या रस्त्याचे कामाचे भुमीपूजन करुन, तातडीने फलक लावण्याची तत्परता दाखवली. मात्र या रस्त्याचे काम झाले किंवा नाही यासाठी पुन्हा फिरकून देखील पाहिले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. या प्रश्‍नी नागरिकांनी सबंधीत नगरसेवक व माजी आमदार यांना संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. 

सत्ताधार्‍यांच्या या गचाळ कारभारामुळे नागरिक वैतागले असताना त्यांनी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांना संपर्क साधून या अर्धवट सोडलेल्या रस्त्याच्या कामाची माहिती दिली. बोरकर यांनी या रस्त्याच्या कामाची पहाणी करुन, या रस्त्याचे काम आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे नेण्याचे आश्‍वासन दिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तर सर्वसामान्य नागरिकांना राजकारणाद्वारे वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी करीत असून, निष्क्रीय नगरसेवकामुळे रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. चार दिवसात या रस्त्याचे काम सुरु न झाल्यास सत्ताधार्‍यांनी काम पुर्ण होण्याअगोदरच लावण्यात आलेल्या फलकाला काळे फासून, चपलांचा हार घालण्याचा राष्ट्रवादीच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्राचार्य अशोक जाधव, महेश घावटे, चंद्रकांत खुळे, दत्तात्रय घावटे, राहुल वाणी, रविंद्र वाणी, महेश कुलकर्णी, विजय धामणे, अविनाश बर्डे, अणेकर सर, धोत्रे, श्रीमती बोरकर आदि उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.