अागामी लोकसभा निवडणुकीसाठी सुजीत झावरे पाटील यांना उमेदवारी द्यावी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अागामी लोकसभा निवडणुकीसाठी सुजीत झावरे यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस डॉ. भास्कर मोरे यांना मांडला. त्यास प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी व नरेंद्र जाधव यांनी अनुमोदन दिले. कार्यकर्त्यांनी तालुक्यात पक्ष मजबूत व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन झावरे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जामखेड राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदासाठी दहा जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांना अहवाल देण्यात आला असून चार दिवसांत तालुकाध्यक्ष निवडीची घोषणा होणार असल्याचे पक्षनिरीक्षक सुजीत झावरे यांनी सांगितले.

झावरे यांनी येथील विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, तसेच तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुक माजी जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, पाटोद्याचे सरपंच समीर पठाण, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, बाजार समितीचे संचालक प्रा. संजय वराट, युवक सरचिटणीस विजयसिंह गोलेकर, जवळा सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप पाटील, वाकीचे बिभीषण परकड यांनी मुलाखती दिल्या. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
झावरे म्हणाले, तालुकाध्यक्षासाठी दहा जण इच्छुक अाहेत. ही गटबाजी नसून पक्ष जिवंत असल्याचे लक्षण आहे. तीनपेक्षा जास्त इच्छुक असल्याने एकमत करता आले नाही. अध्यक्षपद मिळाले नाही, तर प्रदेश कार्यकारिणी, जिल्हापातळी व तालुका स्तरावर पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.