सरपंचपदावरून जामखेड तालुक्यात राजकीय दंगल; बारा आरोपींना अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरपंचपदाचा राजीनामा न दिल्याच्या कारणावरून मोहरीत उसळलेल्या दंगलीत ४४ जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह दंगल व आर्म अॅक्टनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. बारा जणांना अटक झाली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मोहरीचे सरपंच युवराज बाबासाहेब हळनोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, २ मार्चला सरपंचपदाचा राजीनामा का दिला नाही, या कारणावरून रामदास शिवदास गोपाळघरे याने लोखंडी टाॅमीने आपल्याला मारहाण केली. इतर आरोपींनी सहकाऱ्यांना काठीने, दगडाने मारहाण करून जखमी केले. जखमी युवराज हळनोर, बाबासाहेब काशिनाथ हळनोर, संजय सुखदेव श्रीरामे, पार्वती सुखदेव श्रीरामे, राधा युवराज हळनोर, राजेंद्र अभिमान गलांडे, बंडू श्रीपती बाबर यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी त्रिंबक बाबासाहेब हळनोर, नंदू दादाराव गोपाळघरे, नवनाथ दादाराव गोपाळघरे, नाना बळीराम गोपाळघरे, गोकुळ गोपाळघरे, रामदास शिवदास गोपाळघरे, शिवदास एकनाथ गोपाळघरे, रोहित नवनाथ गोपाळघरे, गोरख गोपालघरे, भास्कर विश्वनाथ गोपाळघरे, राहुल गोरख गोपाळघरे, पप्पू गोरख गोपालघरे, बाळू भिमा ठोंबरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, गुड्डू भास्कर गोपालघरे (सर्व मोहरी), तसेच भाऊसाहेब नारायण जायभाय, संभाजी जायभाय, कांतिलाल जायभाय यांचा मुलगा, पंडित जायभाय (सर्व जायभायवाडी) आदी वीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. शिवदास एकनाथ गोपालघरे, बंडू भिमा ठोंबरे, भिमा ठोंबरे, रामदास शिवदास गोपालघरे या चौघांना अटक करण्यात आली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विरोधी गटातर्फे त्रिंबक नंदाराम गोपाळघरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी घरासमोर बोलत असताना मच्छिंद्र नामदेव श्रीरामे याने तू सरपंचाला गावाच्या कामात विरोध का करतो, असे म्हणत डोक्यावर वार करून जखमी केले. इतरांनी लाकडी दांडक्याने दगडाने मला व सोडवायला आलेल्या मामाला व सहकाऱ्यांना मारहाण करून जखमी केले. 

या फिर्यादीवरून मच्छिंद्र नामदेव श्रीरामे, युवराज बाबासाहेब हळनोर, लखन सुखदेव श्रीरामे, भिवा श्रीपती बाबर, संजय सुखदेव श्रीरामे, सुखदेव नामदेव श्रीरामे, अक्षय अशोक श्रीरामे, बाजीराव शिवाजी बाबर, बबन तात्याराव हळनोर, मनोज बबन हळनोर, रवींद्र शिवाजी बाबर, अशोक शिवाजी बाबर, धनंजय किसन श्रीरामे,भागवत धनंजय श्रीरामे, सागर बाळू चव्हाण, धिरज सुधाकर काळे, सुधाकर माधव काळे, बलभीम अण्णा कांबळे, उमेश बलभीम कांबळे, बाबासाहेब काशिनाथ हळनोर, अशोक श्रीरामे, हनुमंत हजारे, चिंतामणी येळे (सर्व मोहरी), राजेंद्र गलांडे (काळेवाडी, ता. करमाळा) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.