कांद्याला मातीमोल भाव; शेतकरी निराश


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर आवक घटूनदेखील कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. रविवारी मोंढ्यावर २६ हजार ९८५ गोण्यांची आवक होऊन १ नंबर कांद्याला १ हजार ते ११२५ रूपये क्विंटल भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी १ नंबर कांद्याला १२०० रूपये भाव मिळाला होता. रविवारी बाजारभावात क्विंटलमागे १०० रूपयांनी घट झाली. मागील पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.