राहुरीत आयोजीत मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द ! लाखोंचा खर्च पाण्यात; कारण मात्र गुलदस्त्यातच ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सिमेन्स प्रकल्पाच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांचा लवाजमा येणार म्हणून शनिवारी सायंकाळी ८ वाजेपयंर्त विद्यापीठ परिसरासह सिमेन्स प्रकल्प येथे लाखो रुपये खर्च करून जय्यत तयारी करण्यात आली. परंतू अचानक मुख्यमंत्र्यांचा दौराच रद्द झाल्याचे वृत्त आल्याने या सर्व तयारीवर पाणी पडले. दौरा रद्द होण्यामागचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नसल्याने जिल्ह्यात तो चर्चेचा विषय बनला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्ह्यात कृषी विद्यापीठ येथे २०१३ साली तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात मा.केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी २५० कोटी रुपये खर्चाचा १०० एकर क्षेत्रावर सिमेन्स (वळू) प्रकल्प मंजूर केला होता. हा प्रकल्प सुरु होऊन २ वर्ष झाले असून या प्रकल्पाचे उद्घाटन केले गेले नसल्याचे लक्षात येताच प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर राज्य मंत्रीमंडळातील ५ मंत्री, खासदार, आमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार होते. गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व 'एनडीडीबी' डेअरी सर्विसेस तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिकारी यांची यासाठी धावपळ सुरु होती.

या कार्यक्रमासाठी दोन वेळा कार्यक्रम पत्रिका छापण्यात आल्या होत्या. जिथे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार होते तिथे सुंदर फुलांची सजावट करुन व्यासपीठ तयार करण्यात आले. मुख्यमंत्री येणार म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे पोलिसांचा लवाजमा तसेच केंद्रातील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिकारी यांची व्यवस्था, पाहुणचार तसेच कृषी विद्यापीठ येथील डॉ.नानासाहेब पवार सभागृह परिसरात प्रदर्शन व मुख्य कार्यक्रम होणार असल्याने तिथेही सर्व तयारी करण्यात आली होती. तसेच जेवणासाठी विद्यापीठाच्या अतिथीगृहात भव्य शामियाना उभारण्यात आला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

अधिवेशनास सुट्टी असताना दौरा रद्द होण्याचे नेमके कारण ?
मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येणार म्हणून खास हेलिपॉड उभारण्यात आले होते. यासाठी केंद्राचा तसेच विद्यापीठाचा लाखो रुपयांचा खर्च निव्वळ एका निरोपामुळे वाया गेला असून मुख्यमंत्र्यांचा हा पूर्वनियोजित कार्यक्रम असतानाही तसेच अधिवेशनास सुट्टी असताना दौरा रद्द होण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न आता सर्वसामन्यांना पडला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.