भाजप सरकारचे दलाल धनंजय मुंडेंची बदनामी करतात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरवून भाजप सरकारच्या काही दलालांनी त्यांची बदनामी चालविली आहे, असा आरोप करत या घटनेचा शिर्डी येथे निषेध करण्यात आला. शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. तसेच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देवून निषेध व्यक्‍त करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेवून कारवाई केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते म्हणाले, राज्यभर सुरू असलेल्या हल्लाबोल आंदोलनातून धनंजय मुंडे शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे प्रश्‍न मांडत आहेत. तसेच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, शिष्यवृत्ती यासारख्या मुद्यांवरुन जनतेचे लक्ष वळवण्यासाठी भाजपने मुंडे यांची बदनामी करण्यासाठी तसेच विरोधी पक्षाला बदनाम करण्यासाठी हे नीच कृत्य केले आहे. परंतु त्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे पुराव्यातून समोर आले आहे. यावेळी धनंजय मुंडे युवा मंचचे विशाल भडांगे यांनी सरकारने मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपासाठी सरकारचा जाहीर निषेध केला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी देखील याप्रकरणी सरकारचा निषेध केला. यावेळी राकेश कोते, दीपक गोंदकर, प्रकाश गोंदकर, प्रसाद पाटील, विशाल भडांगे, विशाल कोते, सिद्धार्थ गोतीस, अमित कुटे, निखिल चांगले, रवी जायभाये, साहिल शेख, आसिम खान, सईद शेख, गौरव कोते, दिपेश वारिअर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.