केके रेंजप्रश्नी सुजित झावरे पाटील संरक्षण मंत्र्यांना साकडे घालणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यासह नगर व राहुरी तालुक्यातील गावे लष्कराच्या केके रेंजमधून वगळण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांची भेट घेणार अाहेत. ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
२७ जानेवारी २०१८ रोजी माजी आमदार (कै.) वसंतराव झावरे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला व वासुंदे येथील शेतकरी मेळाव्याला शरद पवार आले होते. यावेळी सुजित झावरे यांनी केके रेंजच्या भूसंपादनासंदर्भात निवेदन देऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली होती. गुरुवारी झावरे यांनी पवार यांची भेट घेऊन स्मरणपत्र दिले. पवार येत्या ६ मार्चला संरक्षणमंत्र्यांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील जमीन घेण्यासाठी लष्कराने जिल्हाधिकाऱ्यांना मोजमाप करण्याचे आदेश दिले असल्याने या गावातील रहिवाशांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन १९९४ नंतर केके रेंजचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

१९९४ मध्ये माजी आमदार वसंतराव झावरे यांनी त्यावेळी संरक्षणमंत्री असलेले शरद पवार यांची भेट घेऊन पारनेर, राहुरी व नगर तालुक्यातील गावे केके रेंजमधून वगळण्यात यावीत, अशी मागणी ढवळपुरी, पळशी व वनकुटे गावच्या सरपंचांना बरोबर घेऊन केली होती. 

त्यामुळे काही वर्षे पारनेर तालुक्यासह नगर व राहुरी तालुक्यातील गावातील लोकांना दिलासा मिळाला होता. परंतु पुन्हा एकदा भूसंपादन प्रक्रियेला वेग आला अाहे. त्यामुळे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांना भेटून तोडगा काढणार असल्याची माहिती सुजित झावरे यांनी दिली.
तोफगोळे धडकू लागले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गेल्या आठवड्यात हेमलतांडा व सुतारवाडी या परिसरात लष्कराचे काही तोफगोळे कोसळले होते. यात एकजण भाजल्याने जखमी झाला. त्यामुळे केके रेंजची धास्ती स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. या प्रश्नी तातडीने तोडगा न निघाल्यास या गावातील लोकांवर विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. तोफगोळ्यांमुळे परिसराला मोठे हादरे बसून घरांना धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जाते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.