वाहनाची धडक बसून शालेय विद्यार्थिनी ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अज्ञात वाहनाची धडक बसून शालेय विद्यार्थिनी जागीच ठार झाली. हा अपघात पुणतांबेफाटा ते झगडेफाटा रस्त्यावरील पवार वस्तीनजीक शनिवारी सकाळी सहा वाजता झाला. संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिकणारी श्रुती रामनाथ कांदळकर (१५) ही विद्यार्थिनी पहाटे सायकलवर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पवार वस्तीनजीक भरधाव वाहनाची तिला जोराची धडक बसली. डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव होऊन श्रुतीचा करुण अंत झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन फसार झाला. अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत श्रुतीने श्वास सोडला होता. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ती खेळ व अभ्यासात अतिशय हुशार होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली. धर्मा भास्कर कांदळकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक दौलत जाधव करत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.