अण्णासाहेब शेलारांच्या नियुक्‍तीमुळे कॉंग्रेसमध्ये उलटसुलट चर्चा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची शुक्रवारी नियुक्‍ती करण्यात आली. मुंबईत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासह कोअर समितीच्या बैठकीत शेलार यांनी नियुक्‍ती करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ना. विखे यांनी शेलार यांना नियुक्‍तीचे पत्र दिले. दरम्यान, शेलार यांची नियुक्‍ती अचानक व अनपेक्षितपणे झाल्याने नेते व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हाध्यक्ष व साई संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद हे रिक्‍त झाले होते. जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी शेलार यांची नियुक्‍ती केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

विशेष म्हणजे शेलार हे विखेंचे कट्टर समर्थक आहेत. असे असतानाही त्यांच्या समर्थकांकडून या नियुक्‍तीबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे. अर्थात, पक्षांतर्गत निवडणुकीत नव्याने नियुक्‍ती न करता विद्यमान जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्षांना “जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे कै. ससाणे व दीप चव्हाण यांना पुन्हा संधी मिळाली होती. त्यावेळी पक्षांतर्गत निवडणुकीत जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यात आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची नावे चर्चेत होती. त्याबरोबर अण्णासाहेब शेलार यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु, पक्षाने “जैसे थे’चा निर्णय घेतल्याने अनेक इच्छुक नाराज झाले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.