तरूणांची अनमोल आयुष्य वाया घलवून आयुष्याची धुळवड !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : सध्याचे तरुण बेफाम व वेगात वाहन चालवणे, स्टायलिश नवनवीन हेअर स्टाईल,आधुनिक परंतु विचित्र आकार व रचना असलेले कपडे परिधान करणे,अशा शुल्लक गोष्टीतच आपले अनमोल आयुष्य वाया घलवून आयुष्याची अक्षरक्ष: धुळवडच उडवत आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असून, पूर्वीच्या काळी शिक्षक विद्याथ्र्याचे अतुट नाते पाहण्यास मिळत. मात्र आज धकाधकीच्या जीवनात विद्यार्थी शिक्षक नातेच दुभंगल्या सारखे वाटत आहे. आज दाहवी बारावीच्या परीक्षेला माजी विद्याथ्र्यास शिक्षक कॉपी देण्यास नकार देतो. म्हणून त्या शिक्षकास हेच विद्यार्थी अर्वाच्च भाषेत बोलतात. हीच का आपली गुरू शिष्याची संस्कृती, आशी म्हणण्याची वेळ आली आहे.

ऐकेकाळी तरुण आपण एक चांगले व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार व्हावे. दोन पैसे कमावून आपले कुटुंब आबाधित कसे राहील. यासाठी धङपङ असायची. मात्र आता तरुण व्यसनाधीन झाला असून, कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता तरुणीची छेङछाङी सारख्या समाजविघातक घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

नवीन पध्दतीची हेअर स्टाईल चांगले कपङे व फिरायला गाङी हेच का ते आजच्या तरूण पिढीचे वैभव हे म्हणण्याची वेळ आली आहे. आज कुठल्याही पिता आपला मुलगा चांगला प्रशासकीय सेवेत जावा अधिकारी व्हावा. स्व:ता दोन पैसे कमवुन कुटुंबाचा आधारवङ व्हावा आशा माफक आशा ठेवतो. 

मात्र आजची तरमण पिढी या सर्व अपेक्षांवर पूर्णपणे पाणी फिरवितो. आज विद्यार्थी अभ्यासाऐवजी इतर अनावश्क गोष्टीत जास्त रस घेतात. त्यातून जीवनाच्या महत्वाच्या टप्यात स्वत:चे कधीही न भरून येणारे नुकसान करून घेत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
चौकाचौकात टोळक्याने बसुन केवळ हुल्लडबाजी करण्यात आपण आज धन्यता मानता आहोत. त्यामुळे चांगल्या मित्राच्या संगतीऐवजी नको त्या गोष्टी घङुन त्यांचे शल्य आयुष्याभर खुणावत राहत.े ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सध्या मुलींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे गावातील असंख्य तरुण गुडघ्याला बाशिंग बांधुन आहेत. मात्र आज वधुपिता नोकरदार जावई मिळावा. यासाठी आटापिटा करताना दिसत आहे. भविष्यात चांगली नोकरी कमाई व स्वत: चे सधन कुंटुब असणाऱ्या घरात मुलगी देणे वधु पिता योग्य समजतात.सध्या बेरोजगाराच्या संख्येत मोठी वाढ झाली. मात्र तसे म्हणण्यापेक्षा आपल्यातच कष्ट करण्याची तयारी राहीली नसून, नको त्या गोष्टी करण्यातच तरूण गुरफटुन जावून आपल्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.