आपण कायदा मानणारे आहोत कायदा हातात घेवू नका - आ.औटी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अभिष्टचिंतन सोहळ्यात तालुकाप्रमुख नीलेश लंके समर्थकांनी केलेला राडा, तसेच त्यानंतर सोशल मीडियावरून ओकल्या जाणाऱ्या गरळीविरोधात कार्यकर्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता संयम बाळगण्याचे आवाहन आमदार विजय औटी यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अभीष्टचिंतनाच्या कौटुंबिक कार्यक्रमास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास तालुकाप्रमुख लंके यांनी जाणीवपूर्वक उशिरा येत सभेचे सर्व शिष्टाचार पायदळी तुडविले. पक्षप्रमुख व्यासपीठावर बसलेले असताना, सभा ऐकण्यासाठी बसलेल्या नागरिकांमधून लंके हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून आले.

भाषणे सुरू असताना लंके समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्याची थेट पक्षप्रमुखांनी दखल घेतल्यानंतर हा प्रकार बंद झाला. कार्यक्रम संपल्यानंतर पक्षप्रमुख हेलीपॅडकडे जात असताना त्यांचे अंगरक्षक बसलेल्या आ. विजय औटी यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत या वाहनाची काचही फुटली. 

हा प्रकार होउनही आ. औटी यांनी कार्यकर्त्यांना त्यावेळीही संयम बाळगण्याचा सल्ला दिला व पुढील संघर्ष टळला. त्यानंतरही सोशल मिडीयावर गरळ ओकली जात असल्याच्या पाश्र्­वभूमीवर पारनेर शहरातील सुमारे पाचशे तरूणांनी आ.औटी यांची भेट घेउन जशास तसे उत्तर देण्यासाठी आमच्यावरील बंधने दूर करण्याची मागणी केली.

कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर आमदार औटी यांनी पारनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका असल्याचे सांगितले. लंके व त्यांच्या समर्थकांनी जे कृत्य केले व त्यानंतर सोशल मिडीयावर ज्या हिन पद्धतीने गरळ ओकली जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यांनी केले म्हणून तुम्हीही तसे करणार असाल तर ते आपल्या संस्कृतीला धरून असणार नाही. त्यांनी जे काही केले ते स्वत: पक्षप्रमुखांनी पाहिले आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतील. स्व.भास्करराव औटी यांनी आपणास सुसंस्कृतपणाचा वारसा दिला आहे. तो जपण्याची आपली जबाबदारी आहे. लंके समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रसारीत केलेल्या संदेशावर प्रत्युत्तर देउ नका. 

आपण कायदा मानणारे आहोत. कायदा हातात घेवू नका असा सल्ला आ. औटी यांनी यावेळी दिला. उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, माजी सभापती गणेश शेळके, विकास रोहकले आदी यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.