अकोल्यात मारहाणीत एकाचा मृत्यू; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : एका व्यक्तीस लाथाबुक्याने मारहाण करीत गळा दाबून ठार मारल्याची घटना अकोले तालुक्यातील कुंभेफळ शिवारात घडली. मनोज सखाराम कोटकर (वय ५५) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, मयत मनोज सखाराम कोटकर हे जीप घेऊन जात असतांना त्याच्या गाडीचा धक्का मोटारसायकलला लागल्याने आरोपी योगेश सावळेराम कोटकर याने मयत मनोज कोटकर यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर इतर आरोपी लक्ष्मण दगडू कोटकर, संभाजी माधव कोटकर, सविता योगेश कोटकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, मयत मनोज कोतकर याची पत्नी व मुलगा घटनास्थळी पोहचले, तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान, मयत मनोज कोटकर यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने ते मरण पावले. आरोपींनी जीव घेण्याच्या इराद्याने तसेच त्रास व धाप येऊन ते मरण पावल्याची तक्रार मयताचा मुलगा अभिजीत मनोज कोटकर याने अकोले पोलिसांत दिली असून यावरून गु.र.नं. ४०/१८ भादंवि कलम ३०४, ३२३, ५०४, ३४ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. अविनाश शिळीमकर हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.