श्रीरामपुरात जागेच्या वादातून तरूणाचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेजारील जागा न विचारता खरेदी केली. याबदल्यात मागितलेली दहा लाख रूपयांची खंडणी न देता पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने दहा ते बाराजणांनी घरात घुसून तलावार, लाकडी दांडा, गज, चाकूने मारहाण करत धुडगुस घातला. यात एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला. आरोपींनी घरातील वस्तूंचीही मोडतोड केली, तसेच महिलांनाही मारहाण केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीरामपूर शहरातील हुसेननगर (फकिरवाडा) मध्यवर्ती प्रशासकीय इमारती शेजारी येथे शुक्रवारी (दि. २) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसांत दहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपी घटनेनंतर पसार झाले. साजीद इब्राहीम मिर्झा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा भाऊ समीर हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मेन रोडवरील पानटपरी चालक इब्राहीम यांचा साजीद हा मुलगा आहे. तो शहरातील एका मेडिकल एजन्सीमध्ये एमआर म्हणून नोकरीस होता. घरच्यांनी केलेल्या जागेच्या व्यवहारासंदर्भात त्याला काहीही माहिती नव्हते. घटनेच्या दिवशी तो औरंगाबादहून आल्याचे समजते. तसेच सायंकाळच्या वेळी त्याला कामानिमित्त लोणी व संगमनेरला जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्याच्यावर हल्ला झाल्याने त्याचा या घटनेत हकनाक बळी गेल्याचे बोलले जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
वसीम मेहमूद खान, अब्दुला अश्पाक शेख, जुबेर अश्पाक शेख, फिरोज गफार खान, आयाज अश्पाक शेख, मुजमल बागवान, फरजाना फारूक शेख, मौलाना अहमद फारूख शेख (सर्व रा. हुसेननगर, श्रीरामपूर), विशाल हरिश्चंद्र लाहुंडे, नीलेश शिंदे (रा. सरस्वती कॉलनी, देवकर वस्ती, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मौलाना अहमद शेख व तन्जील गफार खान यांना अटक केली आहे. आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.