कॉपीबहाद्दर विद्याथ्र्याची शिक्षकास शोलेस्टाईल धमकी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बारावीच्या विद्याथ्र्याचा शनिवारी गणिताचा पेपर होता पेपरची वेळ संपण्यापूर्वी एका विद्यार्थाला कॉपी करतांना महसूल विभागाच्या पथकातील एका अधिकाऱ्याने कॉपीसह पकडले. परंतु या विद्याथ्र्याने कारवाईच्या भीतीपोटी संबंधित अधिकाऱ्यास चक्क ब्लॉकमधून उडी मारण्याचीच धमकी दिल्याची घटना एका नामांकीत विद्यालयात घडली आहे .पाथर्डी तालूक्यात यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात आले, आणि या अभियानास शंभरटक्के म्हणता येणार नाही. परंतु विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शनिवारी बारावीचा गणिताचा पेपर होता. त्यावेळी पेपर सुटण्याअगोदर महसूल विभागाच्या एका पथकाने एका परीक्षा केंद्रास अचानक भेट दिली असता. त्या ठिकाणी एक विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आला. आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने त्या विद्याथ्र्याने चक्क दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ब्लॉक मधूनच उडी मारण्याची धमकी दिल त्यामुळे या अनपेक्षित घटनेने संबंधित अधिकारी अन् उपस्थितीत विद्यार्थी देखील अवाकच झाले. परंतु त्या विद्याथ्र्याची मनस्थीती समजावून घेत त्याच्यावर होणारी कारवाई टळली. नंतर त्या विद्याथ्र्याने देखील त्या अधिकाऱ्याची माफी मागत या प्रकाराला पूर्णविराम दिला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मात्र या प्रकाराची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. सध्या बारावीच्या परीरक्षांबरोबरच दहावीच्याही परीक्षा सुरू झाल्या आहेत. भरारी पथकासह महसूल, शिक्षण विभागाचे कर्मचारी परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देण्याची तयारी केलेली आहे.विद्यार्थी तणावमुक्त परीक्षा देत असताना देखील काही परीक्षा केंद्रावरच पथकाकडून अधिकच वॉच ठेवण्याचे काम केले जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.