शिर्डी दंगलीतील आरोपींची निर्दोष मुक्तता सचिन तांबे, माजी आ.मुरकुटे यांना दिलासा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : शिर्डी शहरातील अतिक्रमणे काढण्यास विरोध करण्याच्या कारणावरून झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातील माजी आमदारांसह १४९ आरोपींची शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी, सन २००४ साली नगरपंचायतीतर्फे शिर्डी शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. परंतु, अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू असताना अतिक्रमणधारक व प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाले. त्याचे पर्यावसान दंगलीत होऊन वातावरण तणावपूर्ण बनले.

याप्रकरणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, बाबूराव पुरोहित आदींसह एकूण १४९ आरोपींविरूद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तत्कालिन पोलीस निरीक्षक व मुख्याधिकाऱ्यांसह तपासी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या पुराव्यातील विसंगती व परिस्थितीजन्य पुराव्यातील अभाव आरोपींच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे गरीब दुकानदार असून त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याने ते निर्दोष असल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. जोशी यांनी केला.

सरकार पक्ष व आरोपीतर्फे बचाव पक्षाचा युक्तीवाद होऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.वाय.ए.के. शेख यांनी सदर गुन्ह्यातील सर्व १४९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अ‍ॅड. आत्माराम जोशी, अ‍ॅड. जयंत जोशी, अ‍ॅड. एस. जे. जोशी, अ‍ॅड. व्ही. पी. खिस्ते, अ‍ॅड. एस. डी. भुजबळ यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.