पारनेर ग्रामीण रुग्णालयात तरुणांनी घातला धिंगाणा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात काही तरुणांनी धिंगाणा घातला. या प्रकरणी एकाला अटक झाली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावण निर्माण झाले होते. मारहाणीची जखम मोठी असताना साधी दुखापत झाल्याचे प्रमाणपत्र का दिले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारत काही तरूणांनी ग्रामीण रुग्णालयात धिंगाणा घातला. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रेनवडी येथील सुंबाबाई रामभाऊ येवले यांनी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली होती की, गावातील सोमनाथ बाबाजी येवले, पूनम सोमनाथ येवले, प्रकाश बाबाजी येवले, भामाबाई बाबाजी येवले यांनी शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या दरम्यान शेती गट नंबर ५२१ मधील जमिनीच्या वादावरुन सुंबाबाई रामभाऊ येवले, रामभाऊ तुकाराम येवले, ऋषिकेश रामभाऊ येवले, हे नांगरणी करत असताना त्यांना लाथाबुक्की व शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सुंबाबाई येवले व त्यांच्या नातेवाईकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमेवर उपचार करुन त्याप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र दिले. सुंबाबाई येवले यांचे नातेवाईक सुहास ज्ञानदेव औटी, नानाभाऊ पोटे व तुषार येवले या तरुणांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन रुग्णालयात धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
फिर्यादीच्या नातेवाईकांचे म्हणणे होते की, रामभाऊ तुकाराम येवले, ऋषिकेश रामभाऊ येवले, सुंबाबाई रामभाऊ येवले यांना मारहाणीत जखम झाल्याने डॉ. अभिलाषा शिंदे यांना विचारणा केली असता की, या लोकांना मोठी जखम झालेली असताना साधी जखम असल्याचे प्रमाणपत्र का दिले? या कारणांवरुन त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या वादावादीत काही तरूणांनी वैद्यकीय अधिकारी व स्टाफला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. सुहास औटी याला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.