पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपींच्या मालमत्तेची होणार चौकशी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेतील साडे चौतीस लाखांच्या पथदिवे घोटाळ्याप्रकरणी नुकताच एक आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. तर इतर दोघे फरार असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून ही माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
महापालिकेतील वॉर्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक 28 या दोन वॉर्डमध्ये 19 पथदिव्यांची बोगस कामांप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी लिपिक भरत काळे याला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी अटक केली होती. तर नुकतेच या प्रकरणातील आरोपी ठेकेदार सचिन लोटके याला अटक केली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. यातील आरोपी विद्युत विभागाचा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे हे दोघे पालिका कर्मचारी अजूनही फरार आहेत. या दोघांच्या मालमत्तांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.