सत्तेसाठी शिवसेनेचे नगरसेवक खा.दिलीप गांधींच्या दारात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. उपमहापौर निवडणुकीत भाजपचा पाठिंबा मिळावा म्हणून शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी शुक्रवारी सायंकाळी खा. दिलीप गांधी यांच्या कार्यालयात जाऊन भाजप नगरसेवकांशी चर्चा केली. या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या बैठकीस भाजपचे दत्ता कावरे वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच मूळचे मनसेचे मात्र आता भाजपामध्ये प्रवेश केलेले नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी व अपक्ष नगरसेवक स्वप्निल शिंदे उपस्थित होते. या बैठकीला खा. गांधी उपस्थित नव्हते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिवसेनेचे अनिल बोरूडे, संभाजी कदम, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, गणेश कवडे, सचिन जाधव, संजय शेंडगे यांनी भाजप नगरसेवकांशी पाठिंब्याबाबत चर्चा केली. भाजपचे तटस्थ राहणे विरोधकांच्या पथ्यावर पडणार असल्याचे यावेळी शिवसेनेकडून भाजपला सांगण्यात आले. सुमारे दोन चाललेल्या या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.