कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब शेलार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी आ. जयंत ससाणे यांच्या निधनामुळे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेलार यांची नियुक्ती केली. शेलार हे विखे गटाचे मानले जातात.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शेलार हे श्रीगोंदा तालुक्यातील कॉंग्रेसचे नेते असून त्यांनी यापुर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. तसेच ते सध्या श्रीगोंदा पंचायत समितीचे सदस्य आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणुक लढविली होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुदत संपल्यानंतर होणार्‍या जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षातंर्गत विखे- थोरात गटात रस्सीखेच होती. मात्र, विद्यमान जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचे अकाली निधन झाल्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदावर अण्णासाहेब शेलार यांची वर्णी लागली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.