उपमहापौरपदासाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उपमहापौरपदासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी, मनसे व बंडखोर गटाची  जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी या पक्षांकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात मनपाची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीत ताकदीने उतरले आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राजकीय घडामोडी पहाता ही निवडणुक अत्यंत अटीतटीची होऊन बसली आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप व माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

उपमहापौरपदासाठी 5 मार्चला निवडणूक होत आहे. त्यासाठी अनिल बोरूडे, दीपाली बारस्कर (शिवसेना), वीणा बोज्जा (मनसे), मुदस्सर शेख (कॉंग्रेस),विपुल शेटीया, अरिफ शेख, समद खान (राष्ट्रवादी) या सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. मनपात राष्ट्रवादी प्रणित शहर विकास आघाडी 21,शिवसेना 19, कॉंग्रेस 10, मनसे 4, अपक्ष 4 असे संख्याबळ आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे काही नाराज नगरसेवक बंडखोर गटात सामील आहेत. बंडखोर गटात दहा नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. या गटाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते करत आहेत. या गटाचे समद खान (राष्ट्रवादी), मुदस्सर शेख (कॉंग्रेस) यांनी अर्ज भरले आहेत. बंडखोर गटाकडून मुदस्सर शेख यांचे नाव पुढे येत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उपमहापौरपद ताब्यात ठेवण्यासाठी डावपेचांना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे निर्णय आ. संग्राम जगताप तर शिवसेनेचे निर्णय माजी आ. अनिल राठोड घेत आहेत. त्यामुळे दोघांंची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.