बहुचर्चित संदीप वराळ हत्या प्रकरण मुख्य आरोपी पिंट्या रसाळ जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी पिंटया उर्फ भाऊ आनंदा रसाळ याला गुरुवारी (दि.२९) मध्यरात्री पारनेर व निघोज पोलिसांनी निघोज-वडनेर रस्यावर पाठलाग करून पकडले आहे. पारनेर न्यायालयाने त्याला मंगळवार दि. ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दि.२१ जानेवारी २०१७ रोजी संदीप वराळ यांची भरदिवसा दुपारी दोन वाजता निघोज एस.टी. बसस्थानक परिसरातील चौकात निर्घृण हत्या झाली होती. यामध्ये पिंटयाचा सहभाग होता. गेल्या १४ महिन्यापासून तो फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याने पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. 

वराळ हत्याप्रकरणातील अद्यापही तीन ते चार आरोपी फरार आहेत. या हत्या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार प्रविण आनंदा रसाळ, माउली आनंदा रसाळ व विकी आनंदा रसाळ तसेच इतर आरोपींना यापूर्वी अटक झालेली आहे. पिंट्या हा फरार असल्याने त्याचा शोध पोलीस घेत होते. 

तो त्याच्या रसाळवाडी येथील घरी येत असल्याचे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजल्याने पोलिस काही दिवसांपासून परिसरात लक्ष देवून होते. गुरुवारी रात्री पारनेर व निघोज पोलिसांनी मोरवाडी, रसाळवाडी व वडनेर रस्यावर पाळत ठेवली असता मध्यरात्री १२ च्या सुमारास पिंटया हा दुचाकीवर बसून वडनेर रस्त्यावरून रसाळवाडीला जात असताना परिसरातील शेतात लपून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. 

पोलीस नाईक शिवाजी कावडे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा पिंट्याने प्रयत्न केला. कावडे यांच्या पायावरून गाडी गेली मात्र पोलिसांनी पाठलाग करून पिंट्याला ताब्यात घेतले. यामध्ये पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार, पोहेकॉ. चव्हाण, पोना. पटेल व निघोज पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस शिवाजी कावडे यांचा सहभाग होता.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
पिंटयाला ताब्यात घेतल्याने वराळ हत्याप्रकरणी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळणार असून पिंटया हा बॅक अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणात तसेच जळीत प्रकरणामध्ये पोलिसांना पाहीजे होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून तो पोलीसांना सापडत नव्हता. 

वराळ यांची निर्घृण हत्या केल्यानंतर निघोज-वडनेर रस्त्यावरून पळुन जाताना विकी रसाळ व पिंटया रसाळ या भावांनी हवेत तलवारी फिरवीत जल्लोष करुन ते दुचाकीवर निघून गेल्याचे अनेकांनी पाहिले होते. तेव्हापासून पिंटयाची दहशत मोठया प्रमाणात होती. अखेर तब्बल चौदा महिने फरार असलेल्या पिंट्याला पोलीसांनी ताब्यात घेतल्याने आता इतर फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. 

दरम्यान, पोलीस कर्मचारी शिवाजी कावडे यांच्या पायावरून पिंट्याने गाडी घालूनही कावडे यांनी जखमी अवस्थेत जिवाची पर्वा न करता पिंट्याचा पाठलाग केला. तसेच वराळ हत्याप्रकरणी इतर फरारी आरोपींना अटक करताना कावडे यांनी धाडसी भुमिका निभावली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.