सत्तेचा वापर सामान्यांसाठी हीच मुंडेंची शिकवण - महादेव जाणकर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य माणसाच्या कल्याणासाठी सत्ता वापरावी. ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. संतांनीही तोच विचार सांगितला आहे. संत भगवान बाबा व वामनभाऊ महाराज यांनी या भागात अध्यात्मिक क्षेत्रात दिलेले योगदान धार्मिक क्षेत्रातील महत्वाची घटना आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आजही लोक बाबा व भाऊ यांच्यावर नितांत प्रेम करतात, असे प्रतिपादन राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जाणकर यांनी केले. तालुक्यातील चुंभळी येथे वै.संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या अखंड हरिनाम सप्ताहाला महादेव जाणकर व खासदार प्रितम मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, आमदार भीमराव धोंडे, मोनिका राजळे,पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, सोमनाथ खेडकर,नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, नगरसेविका मंगल कोकाटे, काशिबाई गोल्हार, दशरथ वनवे, प्रकाश बडे, प्रकाश खेडकर, बाबूराव केदार उपस्थीत होते. 

यावेळी जाणकर म्हणाले, यावेळी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पाईक आहोत. संत वामनभाऊ महाराज यांनी केलेली अध्यात्मिक क्रांती अलौकिक आहे. पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे भाऊ या नात्याने भक्कमपणे उभे राहण्याचे काम आगामी काळात करु.संत वामनभाऊ महाराज यांनी या भागातील जनतेला धार्मिक संस्कार दिला. त्यांच्या वैचारिक धनावर येथील माणसाची मने सुपीक बनली. इथे पाण्याचा दुष्काळ असेल मात्र संस्कार व बुद्धीवंताचा सुकाळ येथील मातीमधे जाणवतो. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर येथील जनतेने भरभरुन प्रेम केले आहे. त्यामुळे या भागाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावण्याचे काम ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करु. संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने सुरु असलेला सप्ताह समाजाला दिशा देणारा आहे. धार्मिक संस्कार मानसाला शांती मिळवुन देतात. धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म आम्ही आणणार नाही. या भागाच्या विकासासाठी निधी देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जाईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.