डॉ. सुजय विखेंच्या खासगी कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर शहरात डॉ. सुजय विखे यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान सक्षम महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डॉ. विखे यांचा वैयक्तिक आहे. मात्र या कार्यक्रमासाठी पंचायत समिती कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका या सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य गणेश शेळके यांनी केला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शेळके यांच्या म्हण्यानुसार सभापती राहुल झावरे यांनी पदाचा वापर करून खासगी कार्यक्रमात सरकारी कार्यक्रम घेण्यास भाग पाडले. शनिवारी (३१ मार्च) पंचायत समिती पारनेर अंतर्गत भारत मिशन ग्रामपंचायतींना ओडीएफ प्रमाणपत्र वाटप करणे, स्वच्छता जाणीव जागृती अभियान व किशोरवयीन मुलींचे आरोग्य मेळावा हा कार्यक्रम घेण्यात येणार अाहे. 


हा शासकीय कार्यक्रम आहे. तो पंचायत समितीच्या सभागृहात घेणे अपेक्षित असताना सभापती झावरे यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी तसेच गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी यंत्रणा खासगी कार्यक्रमाला लावून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले. पंचायत समिती सदस्यांनाही या बाबतीत अंधारात ठेवले असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
परीक्षा कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम सध्या परीक्षेचा कालावधी अाहे. शनिवारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना शाळा,कॉलेज प्रशासनाने अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांना सहभागी का आणि कोणाच्या दबावातून केलेे? पारनेर महोत्सवात भर पडावी म्हणून या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज प्रशासनाने या कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. हे प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर चालते असा सवाल शेळके यांनी केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.