श्रीगोंद्यातील सतरा रस्त्यांच्या कामात सतरा विघ्न, रस्त्याच्या कामास अतिक्रमणांचा अडथळा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा नगरपालिकेने नागरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे ३३ कोटी रुपये खर्चाचे शहराला जोडणारे १७ रस्त्यांचे काम सुरु केले आहे. हे रस्ते निश्चितच शहराच्या वैभवात भर घालणारे आहेत.तरीही या रस्त्यांचे काम सुरू होण्यापासूनच या सतरा रस्त्याच्या कामात येणारे अडथळे काही कमी होताना दिसत नाहीत. अनेक अडथळे पार करून ही रस्त्यांची कामे सुरू असली, तरी सध्यातरी मोजमापाप्रमाणे रस्ते बांधण्यासाठी सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमणे अडसर ठरत आहेत.काही रस्त्यांवरील अतिक्रमणे वाचवण्यासाठी सोयीनुसार रस्त्याची रुंदी कमी जास्त करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नागरिक अतिक्रमणे काढण्यास मज्जाव करत असतील, तर शहराच्या विकासासाठी नियमाने ही अतिक्रमणे काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु नगरपालिका प्रशासन तसेच सत्ताधारी व विरोधी नगरसेवक देखील या अतिक्रमण प्रश्नी फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. सन १९९० साली श्रीगोंद्यात नगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासून नगरपालिकेने आणि प्रशासनाने लक्ष दिले असते, तर आतापर्यंत शहराला आकार आला असता. शहरातील नेतृत्वानेही अतिक्रमणाला सोयीस्कर बगल दिल्यामुळे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, नगरपालिकेला आता जड जात आहे. 

वडाळी रोडवरील रस्त्याला बाधा येत असल्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आपले कुंपण मागे घेतले. मात्र शनिचौकातील अतिक्रमणाला नगरपालिकेने अद्याप हात घातला नाही. चौकातील अतिक्रमीत इमारती, टपऱ्या तशाच आहेत. या अतिक्रमणांमध्ये नेत्यांच्याच कार्यकर्त्यांच्या अतिक्रमणांचा भरणा जास्त प्रमाणात असल्यामुळे नेमकी कारवाई कुणी आणि कुणावर करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दौंड जामखेड रस्त्यावरील अतिक्रमणे ही तशीच आहेत. या रस्त्यावर स्टेशन रोड ते सिद्धेशवर चौक हा रस्ता ३० मिटर रुंदीचा होणे अपेक्षित आह. प्रत्यक्षात मात्र या रस्त्यावरील अतिक्रमणे वाचवण्यासाठी हा रस्ता खूपच कमी रुंदीचा बनवला जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्याचप्रमाणे पेडगाव रस्त्यावरील सिद्धेशवर चौकातील फुटपाथ तसेच ठेवून या ठिकाणी रस्ता होणार आहे. परंतु या फुटपाथमुळे मुख्य चौकातच रस्त्याची रुंदी कमी होणार असल्यामुळे त्याठिकाणचे फुटपाथ काढून तिथे रस्ता रुंद करण्याची गरज आहे तसेच अनेक ठिकाणी तर रस्ते तयार झाल्यानंतर पुन्हा नव्याने काहींनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे, याकडे आपल्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत. 

या १७ रस्त्यांमुळे श्रीगोंदा शहराचा चेहरा बदलणार असला तरी गावातील व शहराला जोडणाऱ्या इतर रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात या रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासनाने घेतली नाही. तसेच लोकप्रतिनिधींनी राजकारण विचारात घेऊन अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले तर श्रीगोंद्याच्या विकासाला बाधा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नगरपालिकेने आता ठोसभूमिका घेऊन रस्त्यांच्यां मार्गात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.