नगरमधील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात चोरी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर येथील बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय अज्ञात चोरांनी फोडून कार्यालयातील ४ हजार २०० रुपयांची रक्कम व अन्य कागदपत्रे चोरुन नेल्याची घटना बुधवारी दि. २८ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबबत सविस्तर माहिती अशी की, बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय बुधवारी रात्री अज्ञात चोरांनी फोडून कार्यालयातील कपाटातून ४ हजार २०० रुपये व अन्य कागदपत्रे चोरुन नेले. दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास पक्षाचे पदाधिकारी कार्यालय उघडण्याकरिता आले असता कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे आढळून आले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तसेच आतील कपाटातील रोख रक्कम व कागदपत्रे चोरुन नेल्याची लक्षात आले. याप्रकरणी ॲड. सुधिर टोकेकर यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. शिंदे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.