खासदार दिलीप गांधींकडून जनतेची दिशाभुल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणी सह इतर मागण्यांसाठी केलेले बेमुदत उपोषण सात दिवसांनी मागे घेतले. मात्र, या उपोषणाच्या निमित्ताने राजकारण्यांचे त्यांच्याविषयी असलेले प्रेम व नाटकी जिव्हाळा उघड्यावर पडला, अशी प्रतिक्रिया अण्णांचे समर्थक तसेच भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे कार्यकर्ते अॅड. श्याम अासावा यांनी व्यक्त केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अण्णांनी उपोषण मागे घेतल्यानंतर भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून अण्णांचे उपोषण आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मागे घेतल्याचे म्हटले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे लोकपाल विधेयक मंजूर व्हावे म्हणून नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. अण्णांना उपोषणापासून परावृत्त करावे व त्यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण केंद्र व राज्यस्तरावर सातत्याने प्रयत्न केला, असे गांधी म्हणतात. 

खा.गांधींकडून जनतेची दिशाभुल 
नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी आण्णांचे आंदोलन सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचा केविलवाणा कांगावा केला आहे. याद्वारे ते जनतेची दिशाभुल करू पाहात आहेत. गांधी हे केवळ खासदार नसुन माजी केंद्रीय मंत्री आहेत. आण्णांना वयाच्या ८० व्या वर्षी उपोषण करावे लागले ही शोकांतिका आहे. त्यांच्या पाठपुराव्याला जर यश येत असते, तर त्यांनी अण्णांना उपोषणाला बसू देण्याची वेळच येऊ द्यायला नको होती, असे अॅड. श्याम असावा यांनी सांगितले.

भेट का घेतली नाही? खासदार गांधी यांनी हजारे यांना उपोषणाला बसू न देण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आपल्या दारापर्यंत आंदोलनाची धग पोहचायला लागल्यावर व राळेगणकरांनी त्यांच्या बंगल्याबाहेर ढोल बजविल्यानंतर ते झोपेतुन जागे झाले. आता श्रेय घेण्यासाठी सोपस्कार म्हणुन केलेला पत्रव्यवहार दाखवत आहेत. आण्णांचे उपोषण चालु खासदार गांधींना दिल्लीत जाऊन आण्णांची भेट देखील घ्यावीशी वाटली नाही, असा खेदही अॅड. असावा यांनी व्यक्त केला.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
काय म्हणतात गांधी ? 
आपल्या प्रयत्नांना प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व केंद सरकारचे कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांच्या राज्य स्तरावरील मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्य केल्याचे जाहीर केले. तसेच केंद्र सरकारच्या आखत्यारीतील मागण्या मान्य करणेबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे जाहीर करत अण्णांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली.
ग्रामस्थांनी आभार मानले ? 
अण्णांनी या उत्तराला प्रतिसाद देऊन मुख्यमंत्र्याच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. असे नमूद करीत खासदार गांधी यांनी आपण केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याचे म्हटले आहे. तसेच राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी खासदार दिलीप गांधी यांचे आभार मानले, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले अाहे. सोबत त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पाठवलेल्या पत्रांच्या प्रती जोडल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.