गड कोणताही असो त्यापेक्षा आपण मोठे नसतो,धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मी राजकारणी असूनही हरिनाम सप्ताहात स्वतःच्या नावाच्या घोषणा ऐकत मिरवून घेणे मला आवडत नाही. त्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. गडाच्या संघर्षाला वेगवेगळे संदर्भ दिले जातात. गड कोणताही असो त्यापेक्षा आपण मोठे नसतो, अशा खोचक शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टीका केली.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तालुक्यातील चुंभळी येथे श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहला सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी कॉँग्रेस शिरूर कासार तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, माजी नगरसेवक चांद मणियार, बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, राजेंद्र दौंड, सीताराम बोरुडे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे, गहिनीनाथ शिरसाट, बाळासाहेब दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात पाथर्डी शहरात धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा राजकीय वादातून ऐनवेळी रद्द झाल्याने धनंजय मुंडे यांच्यासाठी अॅड. ढाकणे समर्थ पुढे सरसावले. टाकळीमानूर गट भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्या भागात हरिनाम सप्ताह सदिच्छा भेट मुंडे यांच्या मिरवणुकीने होते. याकडे राजकीय अभ्यासक बारकाईने बघत आहेत. धनंजय मुंडे यांनी योग्य वेळी तालुक्यात एंट्री करत नगर जिल्ह्यात डोकावण्यात प्रारंभ केला आहे.

मुंडे म्हणाले, गेल्या १४ वर्षांपासून संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी पूजनाचा मान महंतांकडून आपल्याला दिला जातो गहीनीनाथ गडाने खूप मोठे केले, त्या उपकारातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. आपल्या माणसांसाठी संघर्ष करण्याची शक्ती मिळावी .
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
सरकारे जातात-येतात सत्ता तर खूप अस्थिर असते. धार्मिक व्यासपीठाचा वापर राजकीय आखाडा म्हणून करणे चुकीचे असून त्यासाठी इतर जागा असून विधानपरिषदेचे सभागृह सुध्दा आहे. इमानदारीसाठीची लढाई शेवटपर्यंत अशीच लढत राहणार आहे.चुंभळी येथे स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह व पुढील वर्षी व्यायामशाळेसाठी निधी देण्याची त्यांनी घोषणा केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.