ज्यांना कर्जमाफी देता आली नाही ,त्यांनी जिल्हा विभाजनाची भाषा करू नये.- डॉ.सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे तीनशे कोटी रुपये देता येत नाहीत, त्यांनी जिल्हा विभाजनाची भाषा करू नये. जिल्हा विभाजनासाठी पाचशे कोटी लागतात. याचा अभ्यास अगोदर पालकमंत्र्यांनी करावा. पालकमंत्री राम शिंदे यांची कोणाबरोबर सेटिंग आहे हे आपल्याला माहीत आहे, असा आरोप काँग्रेसचे डाॅ.सुजय विखे यांनी केला आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जामखेड येथे डॉ. विखे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद््घाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात ,माजी उपसभापती अंकुश ढवळे, साकत सोसायटी चे अध्यक्ष अरुण वराट ,बंकटराव बारवकर, किसनराव ढवळे, भारत काकडे, सुनील शिंदे ,गजानन फुटाणे ,मकरंद काशिद, अरूण जाधव, विशाल डुचे, ज्योती गोलेकर, अरूण जाधव ,अमित जाधव, कैलास वराट, अशोक गिरमे आदी उपस्थित होते

डाॅ विखे म्हणाले, मी मूळ राजकारणी नाही, ज्याचा स्वत:चा मेंदू खराब झाला आहे तो राजकारणात आला आहे.राजकीय प्रवासात मी भरकटलो गेलो आणि राजकारण आलो आहे. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील पुढारी बोलत नाहीत.फक्त पालकमंत्री शिंदे बोलत आहेत. त्यांना विभाजन करून काय साध्य करायचे आहे तेच कळत नाही. याविषयामुळे शिंदे इतर प्रश्न विसरून गेले आहेत.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
यामध्ये समाजाचा काय फायदा होणार हे पालकमंत्री यांनी सांगितले पाहिजे. विभाजन करण्या अगोदर तालुक्यातील औद्योगिक वसाहत, कुकडीचे पाणी युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना कर्ज माफीचे पैसे द्यावे. ग्रामसेवकांची रिक्त पदे भरा, असे अनेक प्रश्न अनेक वर्षे झाले तरी सुटले नाहीत ते सोडवा मगच जिल्हा विभाजन करा, असे प्रश्न असतांना लोक यांना कसे निवडुन देतात हेच कळत नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.