नगर मनमाड रोडवर अपघातात तिघे जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता नगरपािलकेच्या अग्नीशमन गाडीस दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जमखी झाले. या पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास नगर मनमाड रोडवर हॉटेल राधिका समोर घडली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केलवड येथील नारायण शिंदे या शेतकऱ्याच्या शेतातील झोपडी व चारा पेटल्याची खबर मिळाल्याने राहाता पालिकेची अग्निशमन गाडी (एमएच १७ एजी ४८३९) हॉटेल राधिका जवळून पिंपळसकडे जाणाऱ्या रोडकडे वळत असताना पाठीमागून आलेली दुचाकी (एमएच २० टी वाय ६१९४) मागील बाजूस धडकली. यात दुचाकीवरील किशोर कल्याण डोखे, वैभव अनंता जगताप व परमेश्वर डोखे हे तिघे गंभीर जखमी झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.