पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात गुंडाराज,दहशतीमुळे मुलीचे शिक्षण बंद !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गुंडांच्या दहशतीमुळे शैक्षणिक जीवनात अतिशय हुशार असलेल्या मुलीचे शिक्षण बंद करून तिला कुलूपबंद ठेवण्याची वेळ एका शेतकरी कुटुंबावर आला आहे. ही घटना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे. विशेष म्हणजे, हे गावही कोपर्डीपासून जवळच आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आरोपींविरोधात आधीही गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्यांना घटनेनंतर सव्वा महिना उलटला, तरी अटक झालेली नाही. उलट, आरोपींना जामीन मिळू नये, यासाठी मुलीच्या बाजूने न्यायालयात खंबीरपणे बाजू मांडणारे वकील अॅड. सुमित पाटील यांच्या विरोधात एका आरोपीच्या चुलतभावाने दरोडा व घर जाळल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे दाद मागूनही काहीही उपयोग झालेला नाही. राजकीय पाठबळ व पोलिसांची कृपादृष्टी यांमुळे सध्या हे गुंड शिरजोर, तर पीडित कुटुंब दहशतीत अशी परिस्थिती आहे.कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील गणेश अप्पासाहेब शेळके (वय ३०) व सोमनाथ ऊर्फ सिद्धेश्वर मेंगडे (वय २८), अशी आरोपींची नावे आहेत. 

संबंधित अल्पवयीन मुलीचा आधीपासून त्रास देत होते.या गुंडांविरोधात ९ फेब्रुवारी २०१८ रोजी संबंधित अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना चार चाकी वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बालकाचा लैंगिक अपराध विरोधी कायद्याचे कलम सात व आठ (पॉक्सो), विनयभंग करणे, चोरून मुलीचा पाठलाग करणे, अश्लील चाळे व हावभाव करणे, मुलीच्या अवतीभोवती गाडीने फेरी मारणे आदी अतिशय गंभीर गुन्हे दाखल झाले.

नेहमी सर्वसामान्यांना पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या पोलिसांनी संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असतानाही त्यांना अजिबात अटक केली नाही. पोलिसांच्या दृष्टीने ते फरार आहेत. परंतु, दररोज ते सर्रास गावात फेरी मारतात. ते पहिलवान आहेत. त्यांच्याबरोबर नेहमी पहिलवानांची टोळी असते. त्यामुळे त्यांची गावात मोठी दहशत आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
फिर्याद देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याने पीडित कुटुंबाने सहा मार्च रोजी उपोषणाचा इशाराही दिला. त्यावर पोलिसांनी दोन दिवसांत आरोपींना अटक करतो, असे तोंडी सांगितल्यामुळे या कुटुंबाने उपोषण केले नाही. यालाही दहा दिवस उलटून गेले. पीडित मुलीचे कुटुंबाने पोलिसांकडे जाऊन चौकशी केली, तर त्यांना 'आमचा तपास सुरू आहे,' 'आज आम्हाला काम आहे,' अशी उत्तरे दिली जातात. 

आरोपी गावात आले आहे, अशी माहिती दिल्यावर पोलिस त्यांना, 'आज आमच्याकडे गाडी नाही,' 'आम्ही दुसऱ्या कामात आहोत,' 'आम्हाला बंदोबस्त आहे,' 'आम्हाला फक्त तुमच्यात गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करणे एवढेच काम नाही,' अशी उत्तरे दिली जात आहेत. या आरोपींचा अटकपूर्व जामीनही जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. 

आरोपी क्रमांक २ असलेला सोमनाथ मेंगडे याच्या विरोधात या घटनेनंतर दहाच दिवसांत खोटे दस्तएेवज तयार करून बँकेची सात लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा जामीनही फेटाळण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. 

आरोपींना अटक न करता पोलिसांचा 'तपास' सुरू असल्याने त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, अशी स्थिती आहे. गुन्ह्यात वापरलेली गाडीदेखील पोलिसांनी अद्याप जप्त केलेली नाही, या वरून पोलिसांचा तपास किती प्रामाणिकपणे सुरू आहे, हेही स्पष्ट होत आहे.

मुलीचे शिक्षण होणार बंद
संबंधित मुलगी अतिशय शैक्षणिक जीवनात अतिशय हुशार आहे. ती विज्ञान शाखेत शिकत आहे. भविष्यात डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते, ते आता तसेच राहिले आहे. कारण तिच्या मनावर या घटनेचा मोठा आघात झाला आहे. तिच्या शारीरिक, मानसिक परिस्थिती व एकूणच भविष्यावर या घटनेचा विपरित परिणाम झाला आहे. सर्व सरकारी यंत्रणा गुंडांच्या पाठीशी असल्याने हतबल झालेल्या कुटुंबीयांनी मुलीचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलीबरोबरच कुटुंबातील इतर सात मुलींच्या शिक्षणाचे दारही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.