मी कोणत्या पक्षात मलाच माहीत नाही : डॉ. सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातून पदवीधर शिक्षक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्याने आमचाही ताण वाढला आहे. माझ्या सर्वांनाच शुभेच्छा आहेत. मला कोणालाही नाराज करायचे नाही. नाहीतर पुढे तुम्ही माझा कार्यक्रम कराल.मोठेपणीही शिक्षकांना घाबरून रहावे लागेल, असे लहानपणी वाटले नव्हते. मी कोणत्या पक्षात आहे मलाच माहिती नाही त्यामुळे मी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी, सभापती राहुल झावरे, माजी जि. प. सदस्य सचिन जगताप, नगरसेवक सुभाष लोंढे, संस्थेचे चेअरमन किशोर जाधव, व्हा.चेअरमन सुरेश मिसाळ, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, सेक्रेटरी सोन्याबापू सोनवणे, संचालक अप्पासाहेब शिंदे, उत्तम खुळे, सुनील काकडे, सुनील वाळुंज, सूर्यकांत डावखर, विनायक उंडे, कल्पना जिवडे, धनंजय म्हस्के, चांगदेव खेमनर, उत्तम जगताप, कल्याण ठोंबरे, भास्कर कानवडे, अंबादास राजळे, बाबासाहेब बोडखे, काकासाहेब घुले, केशव गुंजाळ, शैला जगताप, पुंडलिक बोठे, सय्यद जाकीर हुसेन, राजेंद्र सोनवणे, प्रा. भास्करराव जऱ्हाड आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, या सरकारमध्ये कोणीच सुखी नाही. आम्हाला वाटले शिक्षक, नोकरदार तरी सुखी असेल पण ते ही नाहीत, असे येथे आल्यावर समजले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.