उपेक्षितांचे प्रश्न सोडविणार : डॉ.सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील सर्वस्तरातील उपेक्षितांचे प्रश्न समजून घेऊन, ते सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे यात कुठलाच राजकीय स्वार्थ नाही. ज्याची गरज आहे ते केले पाहिजे हाच खरा माणूसकी धर्म आहे. हीच माणुसकी विखे घराण्याने जपली आहे तेच काम मी पुढे करणार आहे. असे मत डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हळगाव येथे दि.२८ मार्च रोजी जनसेवा फाऊंडेशन व डॉ. विखे पाटील संचलित डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी ते बोलत होते.

यावेळी सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, माजी जि.प,सदस्य मधुकर राळेभात, साकत सेवा सो.साचे प्रा.अरूण वराट,काँगे्रसचे तालुका उपाध्यक्ष कैलास वराट, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, माजी उपसभापती अंकुश ढवळे, राष्ट्रवादीचे संजय वराट, बाजार समितीचे संचालक करण ढवळे, मकरंद काशिद. नगरसेवक अमित जाधव, सागर सदाफुले, शिवाजी ढवळे, शरद भोरे, भारत काकडे, माजी संचालक किसनराव ढवळे. सतीष साळवे, हभप अमृत महाराज डुचे, यांच्यासह महिला ग्रामस्थ उपस्थित होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
डॉ.सुजय विखे म्हणाले, कुठलीही समाजसेवा करताना ती मी राजकारण विरहीत करतो. हे राजकीय काम नाही, हे राजकीय स्टेज नाही, हे समाजकार्य आहे.तालुक्यातील हे दुसरे शिबीर आहे. पहिले शिबीर साकत येथे घेतले.येथे १८०० रूग्णाची तपासणी केली. आपण सर्व सामान्यांच्या कामाला आलो पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवल्या पहिजेत ही विखे घराण्याची परंपरा आहे व ती आपण यापुढेही चालवत आहोत. 

जी मूलभूत सेवा तुमच्या येथील लोकनियुक्त प्रतिनिधीने करायला हवे पण ते करत नाही म्हणून मी करतो पुढेही असेच काम करणार आहे. सायंकाळी ५ वाजता नगर रोडवरील नवीन पंचायत समिती समोर जामखेड येथे डॉ.सुजय विखे यांच्या जनसंपर्क कार्यालयचे उट्घाटन पार पडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर राळेभात यांनी केले व आभार करण ढवळे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.