साई संस्थानच्या रुग्णालयात पैशांसाठी ९ तास रुग्णाच्या मृतदेहाची हेळसांड !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानकडे मोठी गंगाजळी भक्तांच्या दानातुन जमा होत असताना केवळ दहा हजार रुपयासाठी तब्बल नऊ तास मृतदेहाची अवहेलना करण्यात आली. साईबाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा करुन गरीबांना मदत केली मात्र साईबाबांच्या शिकवणीला हरताळ फासण्याचे काम रुग्णालय प्रशासनाने केल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
एकीकडे कोट्यावधी रुपयांचे दान साईचरणी भक्तगण टाकत असताना दुसरीकडे मात्र साईबाबा रुग्णालयात केवळ १० हजार रुपयासाठी एक,दोन नव्हे तर तब्बल ९ तास रुग्णाच्या मृतदेहाची हेळसांड करण्यात आली. मृतदेह ताब्यात मिळत नसल्याने अखेर नातेवाईकांनी राहाता शहरात जाऊन पै-पै गोळा करुन दहा हजार रुपये जमा करुन अखेर मृतदेहाची सुटका करुन घेतली. या संतापजनक प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुणे येथील छाया संतोष पारखे (वय ४५) या राहाता येथे पाडव्याच्या सणानिमित्त नातेवाईकांना भेट देण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान त्यांना ब्रेनट्युमरचा त्रास होत असल्याने साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी त्यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले. त्यांचे बुधवार दि. २८ रोजी सकाळी निधन झाले. 

सदर रुग्णाचे हॉस्पीटलचे बील सुमारे एक लाखाच्या जवळपास झाले होते. यापैकी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय प्रशासनाने ८० हजार रुपये माफ केले, उर्वरीत दहा हजार रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाणार नसल्याचे रुग्णालयाच्या वतीने नातेवाईकांना सांगण्यात आले. एवढी मोठी रक्कम माफ केली मात्र केवळ दहा हजार रुपयांसाठी मृतदेह ताब्यात देत नसल्याने नातेवाईकांनी वारंवार विनंती केली मात्र रुग्णालय प्रशासनाने मात्र स्पष्ट नकार दिला. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
अखेर नातेवाईकांनी राहाता येथे जाऊन दहा हजार रुपये जमा करण्यासाठी प्रयत्न केले. परिस्थीती गरीबीची असल्याने नातेवाईक सदर रक्कम भरु शकत नव्हते. पैसे नसल्याने हताश झालेले नातेवाईकांना हात पसरण्याची वेळ आली. पै पै जमा करुन अखेर दहा हजार रुपये जमा केले. पैसे भरल्यानंतरच साईबाबा रुग्णालयातुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पैशांअभावी पुणे येथे जाऊ न शकल्याने सदर मृतदेहावर राहाता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.