नगर-दौंड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-दौंड रस्त्यावर चिखली घाटात ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने कोळगाव येथील दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला. शहरानूर इसाक पिरजादे (वय ५०) असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर दुचाकीवरील सतीश नाना नलगे (वय ५०) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी (२८ मार्च) दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात झाला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अपघाताबाबत हकिकत अशी की, पिरजादे व नलगे हे दुचाकीवरून नगरवरून कोळगावला येत असताना चिखली घाटात नगरकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक शहरानूर पिरजादे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले सतीश नलगे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नगरला हलविण्यात आले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
बेलवंडी पोलिसांना माहिती मिळताच अपघातस्थळी पोलिस पथक रवाना झाले. अलताब मुरार पिरजादे (रा. कोळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. अपघातात ठार झालेले पिरजादे यांचा मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.