कोपर्डी आरोपींवर हल्ला; चौघांना 5 वर्षे सक्तमजुरी; 19 हजारांचा दंड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार युवकांना न्यायालयाने प्रत्येकी ५ वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १९ हजार रुपयांचा दंड ठोठावला. जिल्हा न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी बुधवारी हा निकाल दिला. १ एप्रिल २०१७ रोजी ही घटना घडली होती. हा हल्ला केवळ आरोपींवरच नव्हता, तर अप्रत्यक्षरीत्या न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला होता, असे मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवले.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बीड जिल्ह्यातील रुईधानोरा येथील अमोल सुखदेव खुणे (२५), गणेश परमेश्वर खुणे (२८), अंबड (जि. जालना) येथील बाबूराव वामन वाळेकर (३०), व राजेंद्र बाळासाहेब जराड (२१) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. हे चौघेही हल्ल्यानंतर लगेच पकडले गेले होते. तेव्हापासून सुमारे वर्षभर ते तुरुंगात होते. 

त्यांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले होते. कोपर्डी खटल्यातील चारही आरोपींना जिवंत मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा यासह विविध कलमान्वये जिल्हा सत्र न्यायाधीश नावंदर यांनी मंगळवारी या चौघांना दोषी ठरवले होते. त्यांना बुधवारी शिक्षा ठोठावण्यात आली.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
आरोपी नगरच्या कोर्टात कोपर्डी खटल्यातील आरोपींना जिवंत मारण्यासाठीच आले होते असे सरकारी साक्षीपुराव्यांवरुन सिद्ध होते. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, कोणीही कायदा हातात घेऊ नये म्हणून ही शिक्षा सुनावत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.