कर्जत एसटी डेपोचा प्रश्न पंधरा दिवसांत सुटणार: ना. शिंदे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित एसटी डेपोचा प्रश्न येत्या पंधरा दिवसांत सुटणार असून, हीच आज नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या वाढदिवसाची कर्जतकरांना भेट देत असल्याची घोषणा जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे केली. सदरचे पत्र आपण आजच आणणार होतो. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे शक्य झाले नाही. कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांचा वाढदिवस तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सद्गुरू गोदड महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक धांडेवाडीचे सरपंच मा. काकासाहेब धांडे यांनी केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी मनोगतात राऊत यांना शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमास नामदेवराव राऊत यांच्या मातोश्री सौ. भामाबाई चंद्रकांत राऊत, वडील चंद्रकांत (भाऊ) राऊत, कर्जत पं. स.च्या सभापती सौ. पुष्पा शेळके, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार, उपसभापती प्रकाश शेळके, बापूसाहेब शेळके, सौ. सुवर्णाताई राऊत, हभप ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज, भगवान मुरुमकर, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, नगरसेविकांसह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
सत्काराला उत्तर देताना राऊत यांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रातील काम चालूच ठेवणार असून, पुढील वर्षापासून आपण वाढदिवसानिमित्ताने अकरा मुलींना दत्तक घेऊन त्याचे कन्यादान करणार आहोत. संत गोदड महाराजांची भूमी प्रेरणादायी असून, या भूमीवरील सर्वच कार्यक्रम नवी दिशा देतात.

शहराचा पाणीप्रश्न आपल्या काळात आपण पूर्ण करू शकलो, याचे समाधान असून, येत्या आठ दिवसांत प्रत्येकाला फिल्टरयुक्त पाणी मिळेल. ना. शिंदे यांनी राऊत यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून आपण आजच एसटीडेपो मंजुरीचे पत्र आणणार होतो; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते मिळू शकले नाही. 

येत्या आठ दिवसांत हे पत्र मिळेल. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सचिन पोटरे यांचे नाव घेऊन त्यांनाही आश्वस्त केले. राऊत हे एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व. मात्र, त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवून कर्जत नगर पंचायतीचे पहिले नगराध्य होण्याचा मान त्यांना मिळाला.

या कार्यक्रमाचे आयोजन महासंग्राम युवा मंचने केले होते. चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमातील भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रावणी यांनी कार्यक्रमात बहार आणली. सूत्रसंचलन स्मिता हिने केले. मिरजगाव येथील जितेंद्र तुपे यांनी सादर केलेल्या गाण्यांनी कर्जतकराना मंत्रमुग्ध केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.