निळवंडे विषयीचे 'त्यांचे' प्रेम पुतना मावशीचे!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निळवंडे धरणाच्या गप्पा मारून मतांची झोळी भरण्याचे दिवस आता संपले आहेत. डबड्याने पाणी प्या व हुलगे पेरा, असे सल्ले देणाऱ्यांचे पुतना मावशीचे प्रेम लक्षात आल्यानेच निळवंडे पाटपाणी कृती समितीचा जन्म झाला. त्यांनी कृती समितीवर टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
निळवंडे प्रश्नी कृती समितीने वेळोवेळी लोकशाही मार्गाने उपोषणे, धरणे, जलदिंडी, रास्तारोको आंदोलने केली. मात्र लोकांनी उठाव करू नये म्हणून कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकरवी लाठीहल्ला घडवून आणला गेला. धरणाचे काम या झारीतील शुक्राचार्यांनी बंद पाडले. 

त्यावेळी काम सुरु करण्यासाठी कृती समितीने केलेला संघर्ष लाभक्षेत्रातील जनतेने जवळून पाहिला आहे. लाभक्षेत्रातील लोकांना पाणी मिळून द्यायचे नाही व टँकरच्या पाण्यावर अवलंबून ठेवायचे व त्यातही घोटाळे करायचे, असे काहींचे धोरण आहे. निधीची उपलब्धता होत असल्याचे निदर्शनास येताच पिण्याच्या नावाखाली पाणी पळवीणारे कृती समितीच्या नावाने आकाडतांडव करू लगाले आहेत. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
पिढ्यानपिढ्या जनतेला फसविणारांवर आता जनतेचा विश्वास राहिला नाही. कृती समितीची दुकानदारी दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेसाठी आहे. समितीवर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, सचिव उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब पवार, मच्छद्रिं येलम, दत्ता भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.