भाजपच्या आमदारांना दाखवले काळे झेंडे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्‍यात आमदार स्‍नेहलता कोल्‍हे यांच्‍या हस्‍ते रविवारी सकाळी कोळगाव थडी येथील ५२ लाख ६४ हजार रूपयांच्‍या पाणीपुरवठा योजेनेचे भुमिपूजन पार पडले. मात्र, या भुमिपूजन सोहळ्यास काळे गटाच्‍या ताब्‍यात असलेल्‍या कोळगाव थडीच्‍या सरपंचासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या काळे गटाने कार्यक्रमावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. तसेच या संतप्त पदाधिकाऱ्यांनी आमदार कोल्‍हे यांना काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्‍यक्‍त केला. श्रेयासाठी आयत्‍या पिठावर रेघा ओढण्याचे काम आमदारांनी केल्‍याची टिका सरपंच शामल लुटे केली.

कोळगाव थडी ग्रामपंचायत काळे गटाच्‍या ताब्‍यात आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता साधे आमंत्रण देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. या हेटाळणीमुळे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

कोळगाव-थडी पाणीपुरवठा योजनेला काही महिन्यांपूर्वी जरी शासनाने मंजुरी दिली असली तरी तत्‍कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोळगाव-थडी व उक्कडगाव ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा. यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत प्रस्ताव दाखल केले होते. 

त्‍या दोनही प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी देवून कोळगाव थडीसाठी ५२ लाख ६४ हजार व उक्कडगावसाठी १ कोटी २९ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेतील अडथळे युवा नेते आशुतोष काळे यांनीच दूर केलेले आहेत. 

या योजनेसाठी आवश्यक असणारे कोळपेवाडी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असेल अशा अनेक प्रकारच्या अडचणी त्यांनी दूर केल्या. त्यांच्या सूचनेनुसार कोळगाव थडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उद्घाटन अतिशय साध्या पद्धतीने कोळगावथडी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी करण्याचे ठरविले होते.

मात्र, आमदारांनी या मनसुब्‍यांना सुरूंग लावून मोजक्‍या उपस्थितीत थेट भुमिपूजन उरकुन घेतले. पदाधिकारी व ग्रामस्थांना या कार्यक्रमापासून दूर ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून काळे झेंडे दाखवत त्यांचा तीव्र निषेध नोंदवीत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.