सरकार जनतेची फसवणूक करतंय: अण्णा हजारे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केवळ लोकपालवर मुद्दा अडलाय, असं मंत्री गिरीश महाजन जे म्हणाले ते बरोबर नाही. यातून केवळ जनतेची दिशाभूल होतेय. दीडपट हमीभाव ही प्रमुख मागणी आहे, तो कसा देणार, त्याची काय पद्धती, याबद्दल सरकार काही बोलत नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शेतकऱ्याच्या पीकाचे भाव ठरवण्याचे अधिकार कृषी मंत्रालयाकडून काढून घ्या. कृषी मूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र दर्जा द्या, अशी मागणी अण्णांनी केली आहे. मराठवाडा, विदर्भात हमीभावापेक्षा 53 टक्के भाव कमी दिलेले आहेत.

भविष्यात उत्पन्नाच्या दीडपटीपेक्षा कमी हमीभाव दिला तर तो सरकारनं भरुन दिला पाहिजे, असं अण्णा म्हणाले. माझ्या मागण्यांवर मी ठाम आहे. कुणी केंद्रातूनच यावं असं वाटत नाही, मला काही फरक पडत नाही, असं त्यांनी नमूद केलं. विलासरावांनी जी भूमिका वठवली आंदोलनात ती चांगली, पण सरकारने आश्वासन पाळलं नाही, असं अण्णांनी सांगितलं. 

माझ्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास कमी झाला असेल, त्यामुळे गर्दी कमी झाली असावी, असं अण्णा म्हणाले. याशिवाय यावेळी रामदेवबाबा, श्री श्री रवीशंकर, राजू शेट्टी हे सोबत नाही, त्याबाबत विचारलं असता, ‘एकला चलो रे’ हेच माझं तत्व आहे, असं त्यांनी सांगितलं. 

कोअर कमिटीतल्या सदस्यांबाबत आरोप होत आहेत, काळजी घ्यायला पाहिजे होती का, असं विचारलं असता, ती काळजी मी घेतली नाही असं लोक म्हणत असतील तर म्हणू द्या. मला फरक नाही, असं अण्णा म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.